महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात चांगलेच चर्चेत आणि वादात सापडले आहेत. त्यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपीने 1804 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केली.
गंभीर बाब म्हणजे या व्यवहारात पार्थ पवार यांच्या कंपनीला तब्बल 21 कोटी रुपयांची स्टँप ड्युटी माफ करण्यात आली आहे. 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर हा करार झाला. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर आणि सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. आता या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे.


