धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे यांनी केलेल्या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी जरांगेंनी मुंडेंवर आरोप करताना पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीची आणि धनंजय मुंडेंची कॉल रेकॉर्डिंग ऐकवली. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता त्यानंतर धनंजय मुंडे यांचा एका फोटो व्हायरल होतोय, त्यात मुंडे कांचन साळवीसोबत असल्याचं दिसत आहेत.
जरांगेंनी क्लिप ऐकवल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याला उत्तरही दिलं. आर्टिफिशल इंटेलिजन्स आज काहीही तयार करता येतं. म्हणे माझं फोनवर बोलणं झालं. माझा फोन 24 तास सुरू असतो या गोरगरीब लोक मला फोन करतात माझं फोनवर बोलणं झाला असेल, पण तुम्हाला संपवण्याच्या उद्देशाने बोललो नसेल. असं धनंजय मुंडे म्हणालेत. पणा आता कांचन साळवीसोबतच्या फोटोमुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलंय.
जरांगे यांना संपवण्याचा कट रचण्यात आला आणि यामध्ये धनंजय मुंडे सहभागी असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी अमोल खुणे दादा गरुड यांच्यासह आणखी एका व्यक्तीचं नाव घेतलं. हा बीडमधील असून तो धनंजय मुंडेंचा पीए किंवा कार्यकर्ता असावा असा अंदाज आहे, त्याचे नाव कांचन साळवी आहे. धनंजय मुंडेसोबतचे काही फोटो आता सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
धनंजय मुंडेंनी अडीच कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा आरोप
धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा जरांगे पाटील यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत केला. धनंजय मुंडे यांनी ‘माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला असून, माझ्याकडे ऑडिओ क्लिपसह सर्व पुरावे आहेत. आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडीने अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगेंनी केला. आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग, मेसेज आणि इतर पुरावे असल्याचंही जरांगे पाटील म्हणालेत.


