पुण्यातील जमीन प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांची सूचक प्रतिक्रिया !
पुण्यातील जमीन प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडालेली असून, या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.
सुरूवातीला या प्रकरणाची मला माहिती नव्हती अशी प्रतिक्रिया अजित पवा यांनी दिली. यानंतर काल या प्रकरणावर बोलताना जमीन व्यवहार रद्द करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
ज्या कंपनीने व्यवहार केला आहे, त्या कंपनीचे संचालक पार्थ पवार आहेत. ९९ टक्के शेअर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्याची ऐवजी १ टक्के शेअर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो. यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच भाजपचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
99 टक्केचा पार्टनर आणि 1 टक्केचा पार्टनर जर वर्किंग असेल तर वर्किंग पार्टनर म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असेल तर याचा अर्थ असा होत नाही की 99 टक्के वर्किंग असणाऱ्या पार्टनरवर गुन्हा दाखल होणार नाही, असे सूचक विधान त्यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
जर मोठा एखादा उद्योगपती असेल आणि त्याच्या कर्मचाऱ्याने एखादा गुन्हा केला तर उद्योगपतीला कशी अटक होईल. त्याची तुम्हाला चौकशी करावी लागेल. त्यानंतर हा गुन्हा दाखल होईल. असा गुन्हा तर कोर्टात देखील सिद्ध होणार नाही, असे देखील मुनगंटीवर म्हणाले आहेत.
या प्रकरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात असून, पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जमीन प्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार या प्रकरणात सातत्याने मोठी माहिती समोर येत आहे.
तसेच या प्रकरणात लवकरच व्यवहार रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर यावर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले व्यवहार रद्द करून सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. कोण कार्यकर्ता आणि कोण नेता यांचा कोणताही पद्धतीचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही.


