मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. या कटामागे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचे सांगितले जात असल्याने सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी मुंडे यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करत धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेस जोडे मारले. यावेळी मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जर जरांगे यांच्या केसाला धक्का लागला तर त्याचे परिणाम राज्याला पहावे लागतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी मुंडे यांची चौकशी करावी जरांगे त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात महेश पवार,सुनील शेळके दिनेश डोंगरे,सचिन गुंड,माऊली पवार, विजय पोखरकर, महादेव गवळी,अरविंद गवळी यांच्यासह सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.


