चंद्रकांत पाटलांनी मोजक्याच शब्दांत स्पष्टचं सांगितलं म्हणाले…
राज्यात पुण्यातील पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
थोडक्यात आरोपांच्या फैऱ्यात पार्थ पवार सापडलेले आहेत.
मुंढवा भागातील १८०४ कोटींचे बाजरभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीचा या जमीन प्रकराणासोबत संबंध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत एकून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ९९ टक्के शेअर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याऐवजी १ टक्का शेअर असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
दुसरीकडे माध्यमांनी हे प्रकरण लावून धरले असून या प्रकरणामुळे अजित पवार यांची कोंडी करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे का? अशा चर्चा होत आहेत. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात आगामी स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खेळी करण्यात येत आहे का अशी चर्चा सुरू असताना याबाबत प्रत्यक्षात असे अजिबात नसल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
रुटीनमध्ये हे प्रकरण समोर आले आहे. महापालिका निवडणुकांशी या प्रकरणाचा अजिबात संबंध नाही, असे म्हणत सुरू असलेल्या चर्चांवर पूर्णविराम दिला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
सुर्याला जे दिसत नाही ते पत्रकाराला दिसतं, त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी कालपासून हा एक आपला अंदाज मार्केटमध्ये टाकला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत धक्का देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खेळली मोठी खेळी पण, असं काही नाही, रूटीनमध्ये एखादा विषय समोर येतो आणि त्याची पण चौकशी व्हायची बाकी आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याच भ्रष्ट्राचाराला सहन करत नाहीत, त्यांनी तातडीने तहसीलदारांना निलंबित केले आहे. मोठे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.


