सुप्रिया सुळे बिहारमधील निकालावर स्पष्टच बोलल्या; हा एकतर्फी निकाल…
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. एकतर्फी, इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकतील असं मीडिया, सर्व्हेंना किंवा जिंकणाऱ्यांनाही वाटत आहे.
आम्हाला याचा अभ्यास करावा लागेल. नितीश कुमार यांचा विजय आहे हे मान्य करावं लागेल असं त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे. बिहारच्या लोकांनी नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. हे यश नितीश कुमार यांचं आहे. पूर्ण निकाल अजून यायचा आहे. आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्हाला आता बघायला पाहिजे की आमच्याकडून कोणत्या चुका झाल्या. एकतर्फी निकाल लागेल असं वाटत नाही. मतविभाजन कसे झाले याचा अभ्यास 2 ते 3 दिवसात करु असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
यशाचे अनके बाप असतात, पण पराभवाला कोणी वाली नसतं असंही यावेळी त्या म्हणाल्या. “राहुल गांधींनी प्रचंड मेहनत केली. राहुल स्टार प्रचार होते. राहुल गांधी यांच्या सभेनंतर फॉलो अप किती केले हे माहिती नाही. कार्यकर्त्यांनी किती काम केले माहिती नाही”.
आपण आत्मचिंतन केले पाहिजे. निकालांनंतर त्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे. मतविभाजनामुळे हा फटका बसला आहे का हे बघाव लागेल. या विषयी मी काँग्रेससोबत आणि तेजस्वींसोबत देखील चर्चा करेन. या निवडणुकीत स्टार प्रचारक आणि चेहरा नितीश कुमार होते. हे यश त्यांचे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाबाबत जे झाले ते तिकडे होईल असं वाटत नाही कारण दोन्ही राज्यात परिस्थिती वेगळी आहे असंही त्यांनी म्हटलं.


