बहुचर्चित बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला अपेक्षेपेक्षापण जास्त मोठं यश मिळालं आहे. जनता दल युनायटेड, भाजप यांच्या युतीने 202 जागा जिकंल्या आहेत.
तेच राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस महाआघाडी फक्त 35 जागांवर आटोपली. महाराष्ट्रासारखेच निकाल बिहारमध्ये लागले आहेत. मागच्यावर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने असचं एकतर्फी यश मिळवलं होतं. बिहारच्या या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात जशी लाडकी बहिण तसं बिहारमध्ये पैसे वाटून निवडणूक होत असेल, तर निवडणूक आयोगाने विचार करावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“जो जिता वही सिकंदर. हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरिक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरिक्षण करणं विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळया प्रकारच्या योजना करण्याची संधी सर्वांना होती. त्यांचं सरकार होतं, तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाहीत, आम्ही योजना आणल्या. लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केलं. त्यात लोकांना दोष देण्याचं कारण काय?” असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
बिबट्याच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?
‘जो पर्यंत ते आत्मपरिक्षण करणार नाहीत, तोपर्यंत ते मातीत जाणार’ असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली, त्यामागच्या कारणांबद्दल विचारलं असता, राज्यातल्या काही मुद्यांवर चर्चा केली असावी असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत आहे, त्यावर मी बैठक घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय, त्यावर फडणवीस यांना विचारलं. “विरोधी पक्ष एकत्र लढतोय की, स्वतंत्र लढतोय. यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती निवडून येईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


