दै. चालू वार्ता वृत्तसेवा वर्धा – उपसंपादक -अवधूत शेंद्रे
—————————————
—————————————
वर्धा – तळेगाव(शा.पंत): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार घडला असून भाजपाच्या एका माजी पदाधिकाऱ्याने आपल्या पत्नीसह आणि सहकाऱ्यांना सोबत घेत वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागात तसेच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संबंधित भाजपा पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांनी आरोग्य केंद्रात येऊन वैद्यकीय अधिकाऱ्याशी वाद घालत त्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे दरम्यान या प्रकरणी तळेगाव(शा.पंत) पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम १३२,१८९(२)१९०, १९१(२)२९६,११५(२)३५१(२)३५१(३) अंतर्गत दाखल केली आहे.या घटनेमुळे सरकारी सेवेतन असलेल्या डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
