सिंचनासाठी शेतकऱ्यांना मिळणार ४०,००० अनुदान; अर्ज कसा करायचा…
राज्य सरकारने शेतकऱ्यांचं सिंचनाचं काम सोपं व्हावं आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी यासाठी एक दर्जेदार निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीतलं पाणी सहज उपसता यावं आणि शेतीचं उत्पादन वाढावं यासाठी मोठी मदत होणार आहे.
सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पंपसंच खरेदीवर तब्बल ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम ४० हजार रुपये निश्चित केली असून, शेतकरी १० HP क्षमतेपर्यंतचे विजेवर किंवा डिझेलवर चालणारे पंपसंच घेऊ शकतात. Sinchan Pump Anudan Yojana
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं सिंचनाचं ओझं कमी होणार, पिकांना वेळेवर पाणी मिळणार आणि उत्पादन वाढून नफ्यातही भर पडणार आहे. विहीर, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर असलेले जलसाठे असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा मिळणार आहे. आणि हाच या योजने मागचा मुख्य हेतू आहे.
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
९०% अनुदानामुळे पंपसंच खरेदीचा खर्च जवळपास नाहीसा होणार.
पाण्याचे स्रोत असले तरी पाणी काढण्यासाठी येणारा त्रास कमी होणार.
पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने उत्पादन वाढणार आणि नफ्यातही भर पडणार.
आधुनिक पंपसंचामुळे पाण्याची बचत होऊन पाणीटंचाईतही कमी येईल.
पात्रता काय ?
BPL शेतकऱ्यांसाठी जमिनीची वरची मर्यादा नाही.
इतर शेतकऱ्यांकडे 0.40 ते 6 हेक्टर जमीन असणे आवश्यक.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांकडे 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास, एकत्रित अर्ज केल्यास पात्रता.
Farmer ID (शेतकरी ओळख प्रमाणपत्र) अनिवार्य.
अर्जदार अनुसूचित जाती/नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
आवश्यक कागदपत्रे
शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)
जात प्रमाणपत्र
आधार लिंक असलेले बँक खाते
BPL प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Farmer ID असल्यास सातबारा, 8-अ उतारा किंवा आधार कार्डची वेगळी गरज नाही.
अर्ज कसा करावा?
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा:
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
अर्ज प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर चालणार असून BPL शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.


