मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांची सारवासारव…
निवडणुकीच्या काळात तुम्हाला मटण देतील, ते खा. पण बटण आमचेच दाबा, नगरविकास आमच्याकडे आहे, नगरविकास विभागाकडे खूप माल आहे, त्यामुळे उठ भक्ता १ तारखेला लक्ष्मी येणार,” असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक येथील सभेत केले होते.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, नगरपालिकेतील विकास नगरविकास खाते करते, त्यामुळे नगरविकास महत्त्वाचा आहे, असे म्हणत शिंदे यांनी सारवासारव केली.
२ डिसेंबर रोजी होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘लाडक्या बहिणींचे मत’ कोणाच्या बाजूने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी सुरू केलेल्या महायुतीला लाडक्या बहिणींनी मताधिक्य मिळवून देत सत्तेच्या चाव्या दिल्या. आता पालिका निवडणुकीत, राज्यभरात महायुतीत असलेले पक्ष स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयानुसार स्वबळावर निवडणुका लढवत आहेत, त्यामुळे आता लाडक्या बहिणी राजकीय आखाड्यात ‘गेमचेंजर’ ठरणार आहेत. काही ठिकाणी महायुतीतील पक्षच एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी नेमक्या कोणाला निवडून देणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लाडकी बहीण योजना मी सुरू केली. लाडकी बहीण योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू झाली. महायुती सरकारतर्फे आमच्या टीमने ही योजना सुरू केली होती, मी मुख्यमंत्री होतो आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते, टीम म्हणून आम्ही ती योजना सुरू केली. लाडक्या बहिणींना किती अडथळे आले ते देखील माहित आहे, परंतु आम्ही एकदा निर्णय घेतला लाडकी बहीण योजना सुरू आणि अंमलबजावणी करण्याची, कोणी कितीही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“कालपासून प्रचार करतो आहे, प्रचार सभांना उपस्थित राहिलो, प्रचंड उत्साह विशेष करून लाडक्या बहिणींमध्ये दिसून येत आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत उत्साह दिसून येत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.


