वैजापूर प्रतिनिधी/ अरविंद पवार
स्नेहसंमेलनाच्या नियोजनात दुपार सत्रात आयोजित माजी विद्यार्थी सोहळ्याला अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच सायंकाळी जि प जाधव वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला या स्नेहसंमेलनात सामाजिक, समाजप्रबोधनात्मक नाटके, विविध गीते आदींच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पं समिती सदस्य, किशोर बाळा पाटील जाधव, शिवाजी तात्या जाधव, एकनाथ आप्पा जाधव, बबन तात्या जाधव, कैलास बापू जाधव,संजय सूर्यवंशी, सूर्यभान पवार, मयूर जाधव, दीपक नवले व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी सरस्वती मातेचे पूजन करत दीप प्रज्वलनाने सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, ऐतिहासिक प्रसंगाचे नाट्यात रूपांतर,मोबाईलचे दुष्परिणाम,संभाजी महाराजांचे स्वराज्य साठी योगदान आदींचे सादरीकरण केले. हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारा, संस्कार करणारा ठरला अशी भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन मुख्याध्यापक मनोजकुमार सोनवणे यांनी केले तर सहशिक्षिका श्रीमती प्रणाली सरोदे, योगिता जाधव यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका मापारी मॅडम, सुदाम बापू जाधव,संभाजी जाधव, आप्पासाहेब जाधव, गणेश जाधव, नामदेव काळे, विष्णू पवार,प्रवीण जाधव, पांडुरंग जाधव, गणेश चन्ने, डॉ. ऋषी जाधव, नितीन जाधव,पुंडलिक जाधव, अरुण गुजराण आणि सुरेश धनेश्वर,गणेश जानराव, बाळासाहेब जाधव,मच्छिंद्र जाधव, नवनाथ जाधव आदीं सर्व उपस्थित होते.
