ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी- विकी जाधव
दि. २६, कर्जत – आज IBSAR लॉ कॉलेजमध्ये भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. विशाल धनवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, उद्दिष्टे आणि बदलत्या काळानुसार त्याची आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर कायदेशीर मार्गदर्शन दिले.
यानंतर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या धैर्यवान जवानांची आठवण करून देत, भारतमातेच्या सेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूरवीरांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाचा औचित्यपूर्ण मान राखण्यात आला.
या विशेष दिनानिमित्त कॉलेजतर्फे भारतीय संविधानावरील क्यूज कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून संविधानातील तत्त्वज्ञान, कलमे, अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये याबद्दल आपले सखोल ज्ञान प्रदर्शित केले.
यानंतर विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण भाषणांची मालिका घेण्यात आली. पुढे ॲड. भक्ती मॅडम यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करवून घेतले. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी ॲड. स्वप्नाली मॅडम यांनी सर्व मान्यवर, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी IBSAR कॉलेजच्या कार्यकारी संचालिका Prof. Meenakshi Monga मॅडम यांचे विशेष आभार व्यक्त केले, कारण त्यांच्या अनुमती आणि सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व प्राध्यापक वर्ग :
लॉ डिपार्टमेंट :
ॲड. विशाल सर, भक्ती मॅडम, स्वप्नाली मॅडम
ICCS Department :
नम्रता मॅडम, मुकुंद सर, कृष्णा सर, श्रद्धा मॅडम
Paramedical Department :
संजीव सर, राजेश सर, निकिता मॅडम, हरिप्रिया मॅडम, हर्षदा मॅडम
इतर वर्ग :
पल्लवी मॅडम, भाग्यश्री मॅडम, श्रुती मॅडम, अनुष्का मॅडम
Non-Teaching Staff :
अविनाश सर, मते सर
विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती, प्राध्यापकांचे सक्षम मार्गदर्शन आणि कॉलेज व्यवस्थापनाचे पाठबळ यामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला.




