ठाणे-प्रतिनिधी (नागेश पवार)
दिवा (२३)- आज नाम निर्देशन पत्र दाखल करण्याचा पाहिला दिवस असला तरी आजचा दिवस हा दिवा प्रभाग समिती हद्दीतील प्रभाग क्रं.२८ मधील गणेश नगर, गणेश मंदिर येथून सुरू करण्यात आलेल्या प्रचार रैली ने सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू असताना, मात्र नियमांना पायदळी तुडवत बँड बाजा घेऊन वाजत गाजत सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकां करवी प्रचाराचा नारळ फोडून रैली काढणे हे एवढंच कमी होते की काय, तर चक्क ह्या रैलीत गळ्यात माफलर छातीवर ब्रोच व असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे झालकावत चक्क दिवा पोलीस चौकी च्या समोरून रैली नेण्यात आली.
खरंच दिवा शहरात कायद्याचे राज्य आहे का?
निवडूक आयोगाने घातलेल्या आचार संहितेचे नियम हे फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच लागू पडतात का?
सुज्ञ नागरिकांनी तक्रार निवारण प्रणालीवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह ?
होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका या पारदर्शक व निष्पक्ष पणे व्हावेत असे आवाहन जरी ठाणे महापालिका मा.आयुक्त सौरभ राव यांनी केली असले, तरी देखील नागरिकांनी अनुभवलेला आजचा प्रकार म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, आता प्रभागासाठी नेमण्यात आलेले रिटर्निंग ऑफिसर माननीय सुनिल शिंदे याची काय दखल घेतात हे पाहावे लागेल, परंतु याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर येत्या काळात सत्ताधाऱ्यांच्या रैली कडे बोट दाखवत विरोधक_ हे देखील आचार संहितेचे नियम मोडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांपुढे ताठ उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
