बिलोली प्रतिनिधी- गणेश कदम
आज दि. 04फेब्रुवारी 2026 रोजी पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अटकळी ता बिलोली जि नांदेड येथे आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारोती पोलकमवाड यांच्या हस्ते आनंद नगरी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पत्रकार बंधू श्री दयानंद भद्रे श्री भास्कर भालेराव श्री अमोल शेरे शाळेचे मुख्याध्यापक श्री कलेटवाड सर श्री भेलोंडे सर श्री चव्हाण सर श्री शहापूरकर सर सौ मुनेश्वर मॅडम सौ मठदेवरू मॅडम सौ मुधाळे मॅडम सौ चालीकवार मॅडम सौ आईलवार मॅडम सौ वाघमारे मॅडम, श्री श्रीनाथ पोलकमवाड सौ औरादे ताई सौ लादे ताई सौ रुख्मिणी शेरे श्री मालिकार्जून पोलकमवाड सौ सगुणा पोलकमवाड सर्व विद्यार्थी उपस्थित होते.यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी यामध्ये वेगवेगळे रुचकर खाद्यपदार्थ बनवून आणले.त्यात चिवडा,मठ्ठा,इयत्ताआठवीच्या विद्यार्थ्यांनी वडापाव, भेळ, नूडल्स मठ्ठा तर काहींनी चहा,शकरपाळे, गुलाबजामून, ढोकळा, आलू वडा, इडली, ब्रेड पकोडे,ब्रेडसमोसा अजून बरेच पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून आणून खरी कमाईचा आनंद घेतला. कलेटवाड सरांनी विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा आनंद काय असतो ते समजावून सांगितले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
