प्रतिनिधी/स्वाती हडकर
गुहागर पंचायत समितीअंतर्गत कोंडकारूळ पंचायत समिती गटाची मतमोजणी सुरू असून, शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार प्रणव कोळेकर यांनी मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर आघाडी घेतली आहे.
मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असून, पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
