रिसोड | प्रतिनिधी -विजय जुंजारे.
मंगरूळपीर तालुक्यात संभाजी ब्रिगेड च्या वतीने तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता विश्रामगृह, मंगरूळपीर येथे पार पडणार आहे. या बैठकीस तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी गजाननदादा भोयर (विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड) हे राहणार आहेत.
तसेच बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून गजाननभाऊ खंदारे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम), गणेशभाऊ सुर्वे (माजी जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, वाशिम) तसेच रमेश मुंजे (जिल्हा सचिव, संभाजी ब्रिगेड, वाशिम) उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीमध्ये तालुका कार्यकारणीचे पुनर्गठन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे नियोजन, आगामी आंदोलनांची रूपरेषा तसेच वेळेवर येणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु यांनी केले आहे.
