दै.चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गुरुवर्य वैकुठवासी मामासाहेब मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने व वै. ह. भ. प. यादव महाराज डांगे यांच्या प्रेरणेने पोखरभोसी ता. लोहा येथे ४५ वर्षांची परंपरा असलेल्याअखंड हरिनाम सप्ताह व श्री गाथा पारायण आणि श्रीमद् भागवत कथा व लक्ष्मण शक्ती सोहळ्यास सुरूवात दि. १२ फेब्रुवारी रोजी पासून ते १९ फेब्रुवारीला काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल.
पोखरभोसी ता लोहा येथे पंचेचाळीस वर्षांची परंपरा असलेल्या गावात भक्तीमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह , व गाथा पारायण आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि लक्ष्मण शक्ती सोहळ्यामध्ये दि. १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विनोदाचार्य, नामवंत किर्तनकार याच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे. तसेच श्रीमद् भागवत कथाकार व्यास श्री. ह भ प. रामेश्वजी महाराज कुबेर यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथा होत आहे. याप्रसंगी गावातील भक्त कथेचा आनंद घेत आहेत.
पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते ११ गाथा पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी १२ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायं. ५ ते ६ हरिपाठ व रात्री ९ वा दररोज हरि किर्तन होईल. यामध्ये दि. १२ फेब्रुवारी रोजी किर्तनकार म्हणून श्री. ह भ. प. रोहीदास महाराज मस्के बामणीकर, दि. १३ फेब्रुवारी रोजी श्री. ह. भ. प. दत्ता महाराज झाडे मुरंबीकर, दि. १४ फेब्रुवारी रोजी श्री. ह. भ. प. डॉ. अशोक महाराज परभणी कर, दि. १५ फेब्रुवारी रोजी श्री. ह. भ. प. कृष्णा महाराज रासवे, दि. १६ फेब्रुवारी रोजी श्री श्री. ह. भ. प. किशोर महाराज सुर्यवंशी लातूर, दि. १७ फेब्रुवारी रोजी श्री. ह. भ. प. नामदेव महाराज रेंगे, जामकर, दि. १८ फेब्रुवारी रोजी श्री. ह. भ. प. विजयानंद महाराज सुप्पेकर, यांचे किर्तन होणार आहे. दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी श्री. ह . भ. प. ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ आणि लक्ष्मण शक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी पोखरभोसी ता. लोहा यांनी केले आहे.
