रिसोड | शहर प्रतिनिधी – विजय जुंजारे
रिसोड – मेहकर मुख्य रस्त्यावर सुरू असलेले कोटींचे काम आता थेट जनतेच्या जीवाशी खेळ करत आहे का? हा मोठा सवाल आज नागरिक विचारत आहेत. अपघात, मृत्यू, धोकादायक रस्ता आणि तरीही प्रशासनाचे मौन — यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या रस्त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला. पण प्रश्न असा — जबाबदार कोण? आणि कारवाई का नाही?
– जनतेचा थेट सवाल
“जनता पूछ रही है — सड़क बनेगी या मौत का सिलसिला चलता रहेगा?”
“इतने हादसे हो गए… फिर भी जिम्मेदार लोग चुप क्यों हैं?”
“काम की स्पीड स्लो क्यों है — और मॉनिटर कौन कर रहा है?”
“जब चुनाव आता है तो वादे होते हैं… चुनाव के बाद जनता भूल जाते हैं क्या?”
शासन नियमांनुसार माहितीफलक लावणे बंधनकारक असताना या रस्त्यावर कामाची किंमत, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी, विभागाची माहिती दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय आणि नाराजी दोन्ही वाढत आहेत.
रस्त्यावर मोठे खड्डे, खडीचे ढिगारे, रात्री लाईट नाही, रिफ्लेक्टर नाही, बॅरिकेड नाही — म्हणजे सामान्य माणूस रोज जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.
जनतेचा संतप्त सवाल – डिबेटचा मुख्य मुद्दा
जिल्हाधिकारी पुढे का येत नाहीत?
लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष पाहणी का करत नाहीत?
माहितीफलक का नाही?
कामाचा वेग कमी का?
अपघातांची जबाबदारी कोण घेणार?
काही नागरिक संतप्त प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत —
“जनता की जान की कीमत क्या सिर्फ चुनाव तक ही है?”
“अगर यही हाल रहा तो आम आदमी कैसे सुरक्षित रहेगा?”
“विकास के नाम पर अगर जान जा रही है तो जवाब कौन देगा?”
नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की प्रशासन आणि संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करावे, सुरक्षा उपाय त्वरित लागू करावेत आणि संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी.
