राजगुरुनगर प्रतिनिधी- विजयकुमार जेठे
हिरवाई पर्यावरण संघ व पर्यावरण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला असून कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे साहेब, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष व पर्यावरण मित्र राजन जांभळे सर, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार दत्ता भालेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगताना आजच्या बदलत्या जीवनशैलीत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्लास्टिकमुक्त जीवनशैली अवलंबण्याचे आवाहन करत पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयावर सादर केलेल्या चित्रकला व निबंधांमधून निसर्ग संवर्धनाबाबतची जाणीव आणि सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत झाली. आयोजकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत सुबकपणे करण्यात आले होते. शिक्षक व स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व हिरवाई पर्यावरण संघाच्या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा जनजागृतीपर कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
एकूणच, पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणारा व विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला असून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळेच्यामुख्याध्यापिका – अर्चना सुतार ,राजमाता जिजाऊ कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका- प्रमिला गुरव. डीजे केंब्रिज सैनिक स्कूल मुख्याध्यापिका —रूपाली मोहिते डीजे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका -सविता सुळ . फातिमा बी शेख शिशु शाळा मुख्याध्यापिका -स्वाती हुलावळे सर्व चित्रकला व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शकवचित्रकला शिक्षिका वृषाली भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -माहेश्वरी खैरे, यांनी केले या प्रसंगी हिरवाई पर्यावरण संघ आणि पर्यावरण समितीचे सचिव ऐश्वर्या काशिद , सदस्या, वृषाली नरोडे, हिरवाई पर्यावरण संघाचे खजिनदार, कविता जेठे,रोहन धोत्रे इत्यादी उपस्थित होते शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या पाहुण्यांचे आभार – माधुरी मुळूक यांनी मानले व शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली ..
