मेघाताई प्रशांत भागवत यांचा इंदुरी-वराळे गटात आभार दौरा, पराभवानंतरही मतदारांच्या डोळ्यात पाणी
मावळ प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
मावळ : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदुरी-वराळे गटात सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी आभार दौरा केला. निवडणुकीत पराभव झाला असला तरी खचून न जाता सदैव लोकसेवेत राहण्याचा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
दरम्यान, निकालानंतरही मेघा भागवत यांनी आपल्या गटातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे. मात्र मावळ तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आमची लढाई सुरूच राहील,असे त्यांनी यावेळी सांगितले.
काल मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी मेघाताई भागवत यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मावळ तालुक्याच्या प्रगतीसाठी भाजप सदैव तत्पर असून आगामी काळात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आभार दौर्यादरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

