वाढवणा प्रतिनिधी -संतोष कांबळे
उदगीर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वाढवणा (बु) जिल्हा परिषद गटात अखेर महायुतीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. या अटीतटीच्या लढतीत भाजपाचे उमेदवार माजी जि. प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी काँग्रेसचे उमेदवार नागोराव चिमनदरे यांचा 280 मतांच्या फरकाने पराभव केला. तसं पाहिलं तर वाढवणा गट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आज पर्यंत ओळखलं जात होतं पण या गटातील विजयामुळे वाढवणा परिसरात महायुतीच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आपला विजयाचा जल्लोष साजरा केला. तब्बल नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या. वाढवणा बु. जिल्हा परिषद गट हा ओबीसीसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसकडून नागोराव चिमनदरे, तर भाजपाकडून रामचंद्र तिरुके यांना उमेदवारी उमेदवारी देण्यात आली होती. सलग दोन टर्म कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या गटात ` स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार ` अशी चर्चा निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू होती. त्यामुळे हा सामना अत्यंत अटीतटीचा होणार, हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते आणि निकालाने त्यावर शिक्कामोर्रतब केले. विजयामागची कारणे- रामचंद्र तिरके यांच्या विजया मागील अनेक महत्त्वाचे कारणे पुढे येत आहे. आमदार संजय बनसोडे यांनी मतदार संघात राबवलेले विकास कामे व त्यांनी दिलेली ताकद हा या विजयाचा मुख्य आधार ठरला. प्रचारादरम्यान लोककलेच्या माध्यमातून – भारुड वासुदेव तसेच लाडकी बहीण या योजनेचा केलेला प्रभावी प्रचार महिला मतदारांना विशेष भावला.
काटे की टक्कर – पहिल्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार नागोराव चिमनदरे यांनी आघाडी घेतली होती. मात्र ग्रामीण भागातील विशेषतः वाढवणा बु. परिसरातील मतपेटी उघडतात रामचंद्र तिरूके यांनी जोरदार मुसंडी मारत अखेर 280 मतांची आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत आपला विजय खेचून आणला
