चिपळूण प्रतिनिधी : स्वाती हडकर
पालवण (चिपळूण): डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मराठी भाषेचे मंत्री तथा उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच चिपळूण नगरपरिषद नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास साहित्य, कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
