प्रतिनिधी सोमनाथ काळे
आळंदी शहरातील नदी घाट हे पर्यटनाचे आणि धार्मिक विधींचे
मुख्य केंद्र आहेत. सद्यस्थितीत घाटावर भाविक आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि अनुचित प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण परिसराचे डिजिटल मॉनिटरिंग (Digital Monitoring) करणे काळाची गरज आहे.
तरी वरील विषय,भाविक तसेच नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असलेने सभागृहाने तो एकमताने मंजूर केला.
*आळंदी शहरातील पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करणेबाबत.*
आळंदी देवाची हे तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो वारकरी आणि पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. शहरात ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक पुरातन कुंडे आहेत, जी सध्या गाळ साचल्यामुळे किंवा देखभाली अभावी दुर्लक्षित स्थितीत आहेत. या कुंडांचे जतन करणे ही आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे.
शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांसाठी/पर्यटकांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करणे अपेक्षित आहे. या अभियानाद्वारे पुरातन वारसा जतन करून पर्यटनाला चालना देणे हा मुख्य उद्देश आहे.
तसेच स्वच्छ आणि सुंदर कुंडांमुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक व्यावसायिकांना फायदा होईल. कुंडांच्या पुनरुज्जीवनामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यासही मदत होईल.
तरी वरील विषयाचे महत्व पाहता सभागृहाने ठराव सर्वानुमते मंजूर केला
*आळंदी नगरपरिषद हद्दीतील हवेली भागातील संपूर्ण परिसर खेड हद्दीतील आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत.**
आळंदी नगरपरिषद हद्दीतील हवेली तालुक्यातील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण तसेच दैनंदिन पोलिस सेवा अधिक प्रभावीपणे मिळण्यासाठी प्रशासकीय दृष्टीने सदर परिसर आळंदी पोलीस स्टेशन (खेड तालुका) अंतर्गत समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.
आळंदी शहरामध्ये आषाढी व कार्तिकी यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. सदर कालावधीत दिघी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येणारे नियोजन अनेक वेळा अपुरे ठरत असून, तातडीच्या पोलिस सुविधा मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
यामुळे हवेली तालुक्यातील आळंदी नगरपरिषद हद्दीतील परिसर आळंदी पोलीस स्टेशन, खेड तालुका अंतर्गत समाविष्ट केल्यास पोलिस प्रशासन अधिक सक्षम व परिणामकारक होईल.
तरी सदर विषयाचा ठराव सभागृहाने सर्वानुमते मंजूर केला.
