दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11 व 12 मधील पाणीपुरवठा बदलणे, पाणी लाईटची व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच स्वच्छता तात्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. पैठण शहरातील नागरिकांना रमजान महिन्यात कोणतीही अडचण येऊ नये, पाणीपुरवठा नियमित व स्वच्छ मिळावा, तसेच परिसरात स्वच्छता राखली जावी यासाठी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक तथा काँग्रेस शहराध्यक्ष हसनोद्दीन कटियारे, गौरव आठवले, इमरान पठाण, स्वप्निल साळवे, तोफिक धांडे, फिरोज पठाण, फैज गाजी, अज्जू कटियारे आदी उपस्थित होते. संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
