दै. चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा – म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ या शाळेत एस.एस.सी शुभचिंतन सोहळा व पारितोषीक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून म्हसळा तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. श्री माधव जाधव हे उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये सौ बिनलताई मांडवकर, रागिणीताई लटके,सौ श्वेताताई विनोद लटके सरपंच, श्री अनिल लटके अध्यक्ष ग्रामविकास मंडळ श्री विनोद लटके व्हाईस चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी, श्री महेंद्र महाडिक सचिव ग्राम विकास मंडळ,श्री निलेश लटके पोलीस पाटील नेवरूळ, श्री योगेश पाटील ग्रामसेवक नेवरूळ, श्रीमती रुक्मिणी काते महिला मंडळ अध्यक्ष,श्री नामदेवरावजी महाडिक चेअरमन स्कूल कमिटी नेवरूळ शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश मिणेकर, श्री कापसे सर, श्री देवळकर सर,विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यां प्रसंगी मार्गदर्शन करत असताना गटविकास अधिकारी श्री माधव जाधव यांनी मुलांना जीवनामध्ये काय बनायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून अभ्यास केला पाहिजे दहावीची परीक्षा ही जीवनातील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा शाळेचे नाव उज्वल करावे शाळेचा मान तालुक्यात सन्मानाने उंचावावा असे नाव कमवा व मेहनत घ्या तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश मिणेकर सर यांनी केले शाळेच्या भौतिक सुविधा बाबत व आजपर्यंत केलेल्या विद्यार्थ्याप्रती मार्गदर्शन व विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षेसाठी भयमुक्त चिंतामुक्त सामोरे जातील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही.
इयत्ता नववीतील पार्थ कापडी, ज्यांनी आपल्या दहावीच्या भावंडांना शुभेच्छादिल्या. इयत्ता दहावीतील सायना बोर्ले,वैष्णवी खताते यांनी याप्रसंगी आपली मनोगत व्यक्त केली. इयत्ता दहावी पर्यंत आमच्यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा निश्चितच आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये यश्वीपणे वापर करणाऱ्यांसाठी आलो आणि सेवेसाठी आम्ही जाणार….
अशी शाश्वती दिली,श्री अनिल लटके मुंबई ग्राम विकास मंडळ अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मौलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्याला अनेक उदाहरण देऊन करिअर साठी आपण मेहनत घेऊन आपले जीवन चांगले घडवावे यावेळी शाळेच्या डांगडुजी व शाळेचे फुटलेली पत्रे बसवून देण्याबाबत आश्वासन दिले तसेच श्री सुनील लटके यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे महत्त्व पटवून दिले व तसेच एम.पी.एससी व यु पी एस सी याबाबत हे मार्गदर्शन केले तसेच श्री नामदेव महाडिक चेअरमन यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आज पर्यंत शाळेसाठी खूप मोठे योगदान नामदेवराव महाडिक यांचे शाळेला लाभलेले आहेत त्यांची मुलेही या ठिकाणातून शिकून पुढे गेलेली आहेत भविष्यात शाळेसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. श्री विनोद लटके यांनी विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या सुविधा उपलब्ध करून दिले रागिणीताई लटके यांच्याकडून विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रदान केले व विद्यार्थ्यांना जीवनात काय बनायचे आहे ते आपण वना असे शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रामचंद्र लटके,भिकू महागावकर,श्री शांताराम लाड मुंबई,श्री सुनील दिवेकर,श्री सुनील लटके,मारुती लाड, श्रीमती चंद्राताई दिवेकर,सौ निलाक्षी रिकामे सौ सुजल काते सौ वर्षा खताते सो बिनल मांडवकर,अंकिता लटके,रा.जि प. शाळा नेव रूळचे मुख्याध्यापकश्री महाजन सर व सहाय्य्क शिक्षक श्री बेंद्रे सर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
