प्रतिनिधी / स्वाती हडकर
चिपळूण : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील जुने पोलीस स्टेशनसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने रस्ता ओलांडत असलेल्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पादचारी रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील कंटेनरने त्याला धडक दिली. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून संबंधित चालकाला अडुर्डे येथे ताब्यात घेतले. पोलिसांकडून पुढील पंचनामा व तपासाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
