प्रतिनिधी /स्वाती हडकर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिराची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली शिबिराची तयारी करण्यात आली आहे.
हे प्रशिक्षण शिबिर दिनांक २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी चिपळूण येथील धवल प्लाझा, तिसरा मजला येथे आयोजित करण्यात आले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या शिबिरात विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींना संघटनात्मक कामकाज, पक्षाची धोरणे व जनसंपर्क याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात तयारीला वेग आला आहे.
