दै.चालु वृत्तसेवा- नाशिक जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी – प्रा.संजय फाकटकर
येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आयोजित ‘एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्त्या व अतिथी नामांकित सुप्रसिद्ध वक्त्या म्हणून डाॅ.कांचन बागुल( सोनार ) यांनी विद्यार्थांशी संवाद साधताना व्यक्तिमत्व विकासाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करताना विद्यार्थांनी
महाविद्यालयातील शैक्षणिक जीवनात अग्रेसर होताना नेहमी वेळेचे नियोजन करा त्यात सातत्य ठेवा तसेच आपल्या जीवनातील सर्वांत जास्त वेळ सोशल मिडियात अनावश्यक ठिकाणी वेळ वाया जातो जे उद्दिष्टे आपण करिअर व जीवनात संपन्नता आणण्यासाठी ठरवतो त्यापासून आपण भरकटत जातो आणि जीवनाचा मार्ग आणखीन कडतर होतो आपल्या जीवनातील गेलाला वेळ कधीच परत येत नाही आणि सुखकर जीवन जगण्याचा आनंद आपण गमावून बसतो म्हणून वेळेला महत्व द्या वेळ तुम्हांला महत्त्व देईल हा संदेश या कार्यशाळेच्या निमित्ताने त्यांनी विद्यार्थांना दिला. तसेच या कार्यशाळेच्या दुस-या सत्राचे वक्ते प्रा.नवनाथ बोंबले ( त्र्यंबकेश्वर महाविद्यालय) यांनी सुद्धा व्यक्तिमत्व विकास ही प्रकिया ही निरंतर चालणारी असून विद्यार्थांनी महाविद्यालयीन जीवनात संस्कारशील जीवन जगून शैक्षणिक क्षेत्रात आघाडी घेतल्यास यशाचे शिखर आपणास जीवनातील विविध क्षेत्रात यश मिळवून दिल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन करून उपस्थित विद्यार्थांचे मन जिंकून घेतले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील यश आणि अपयश हे विद्यार्थांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर अवलंबून आहे हे महाविद्यालय नेहमी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाला आणि प्रगतीला विविध शैक्षणिक सुख- सुविधांबरोबरच अनेक उपक्रम राबववू संधी देत असते त्याचा फायदा नेहमीच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाला पोषक ठरत आहे. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा. मकन्हैया चौरेसिया, डाॅ.विष्णू राठोड, डाॅ.एस.एस.परदेशी, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डाॅ.अंबादास कापडी, प्रा.नवनाथ बोंबले उपस्थित होते. कार्यशाळेची सुरुवात सरस्वती पुजनाने व महाराष्ट्र गीताने झाली कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.भाऊसाहेब मुन्तोडे यांनी केले तर अतिथीचा परिचय प्रा.कल्पना कोतोडे यांनी केले तर या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती भोर व आभारप्रदर्शन प्रा.अंबादास कापडी यांनी केले. हा उपक्रम यशस्वतेसाठी प्रा.अरूण वाघ, प्रा.गोपाळ लायरे, प्रा.बलराम कांबळे यांनी प्रयत्न केले. या कार्यशाळेसाठी विविध शाखेतील विद्यार्थीवर्ग व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
