दैनिक चालू वार्ता धाराशिव/ प्रतिनिधी-समीर मुल्ला
कळंब:- जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची वर्दळ वाढली आहे.रात्रीच्या वेळी किंवा धुक्यात रस्त्याच्या कडेला उभी असलेली किंवा संथ गतीने चालणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रिफ्लेक्टरअभावी इतर चालकांना दिसत नाहीत, ज्यामुळे भीषण अपघात होतात. मात्र, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग अशा वाहनांवर कडक कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि साखर कारखान्यांच्या उसानी भरलेल्या ट्रॅक्टर च्या दोन ट्रॉली जोडून पाच-सहा फूट होणारी धोकादायक वाहतूक मागील बाजूने रिफ्लेक्टर नसल्यामुळे मागून येणाऱ्या दुचाकी किंवा चारचाकी चालकांना समोर वाहन असल्याचा अंदाज येत नाही. धुके आणि अंधारात हे अपघात अधिक जीवघेणे ठरत आहेत. जिल्ह्यात भूम-धाराशिव, ढोकी -कळंब, कळंब – शिराढोण रस्त्यासारख्या प्रमुख मार्गांवर ऊसानी भरलेले ट्रॅक्टर उलटण्याच्या घटना घडल्या आहेत. ढोकी-कळंब हा रस्ता वळणावळणाचा असल्याने रात्रीच्या वेळी रिफ्लेक्टरअभावी अपघात होण्याचा धोका हा जास्त आहे, रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या धुक्यात रिफ्लेक्टर नसलेले ट्रॅक्टर-ट्रॉली मागून येणाऱ्या चालकांना दिसत नसल्याने हे अपघात होतात, ट्रॉलीच्या पाठीमागे ६ इंच रुंदीची लाल रंगाची रेडियम पट्टी तसेच ट्रॉलीच्या मागे किमान दोन लाल रिफ्लेक्टर असणे कायद्याने बंधनकारक असून ही याकडे गांभीर्याने संबंधित कार्यालय पाऊल उचलतानी दिसत नाही
रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना कारखान्यानी प्रवेश देऊ नये किंवा तेथेच रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. कळंब परिसरात आरटीओने भरारी पथके नेमून विना-रिफ्लेक्टर वाहनांवर दंड आकारण्यात यावा अशी मागणी नागरिकां मधून होत आहे.
“ढोकी-कळंब तसेच कळंब – शिराढोण रोडवर दररोज शेकडो ऊस भरलेली वाहने धावतात. रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात ही वाहने दिसत नाहीत, ज्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. साखर कारखान्यांनी केवळ नफा न पाहता, शेतकऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक ट्रॉलीला मोफत रिफ्लेक्टर बसवून दिले पाहिजेत.
