शिक्रापूर प्रतिनिधी –प्रफुल्ल गायकवाड
खैरेनगर येथे भारतीय सैन्यात तब्बल २६ वर्षे देशसेवा बजावून सेवेतून निवृत्त झालेल्या नायक सुभेदार मारुती अर्जुन खैरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला
Indian Army मध्ये ९ फेब्रुवारी २००० रोजी रुजू झालेल्या खैरे यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली त्यांनी २६ वर्षे विविध ठिकाणी देशसेवा बजावत खैरेनगर गावाचे नाव उज्ज्वल केले ते 01 Bombay Sappers (ट्रेनिंग बटालियन) मध्ये कार्यरत होते
निवृत्ती निमित्त खैरेनगर ग्रामस्थांकडून त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला गावातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह त्यांचे जल्लोषात स्वागत केले
मिरवणुकीपूर्वी नायक सुभेदार खैरे यांनी गावातील शहीद जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले
सोमनाथ बबन खैरे तसेच राजेंद्र सुदाम सातपुते यांच्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी विनम्र अभिवादन केले त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली
या कार्यक्रमाला गावचे सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी युवक वर्ग तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर समस्त ग्रामस्थांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती
नायक सुभेदार मारुती अर्जुन खैरे यांच्या देशसेवेचा गौरव करताना ग्रामस्थांनी आपल्या गावचा सुपुत्र देशसेवेचे ऋण फेडून परतला हा खैरेनगरसाठी अभिमानाचा क्षण आहे अशा भावना व्यक्त केल्या
