सटाणा (नाशिक) : अमोल बच्छाव
बागलाण तालुक्यातील महसुल प्रशासनात वाढलेला भ्रष्टाचार आणि जनतेची चाललेली लुट या वृत्ती विरोधात रिपब्लिकन सेनेने होळी सनाच्या औचित्यावर भ्रष्टाचारी वृत्तीचे प्रतिकात्मक होळी दहन केले.
बागलाण मध्ये ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात अवैधरित्या गौण खनिज तस्करी वाढली असताना, या प्रकाराला महसुल प्रशासन, तलाठी, मंडल अधिकारी यांची चिरिमिरी व्यवहारान्वये मुकसंमती चालु आहे.
त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती, पर्यावरण, निसर्ग यांची प्रचंड हानी होत आहे. ज्या बागलाण भूमीला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, ज्या डोंगररांगांना शिवरायांचा पदस्पर्श आहे त्यांची लुट मोठ्या प्रमाणात चालू आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असल्याने केवळ भ्रष्टाचारी वृत्तीतून याकडे दूर्लक्ष केले जात आहे. या वृत्तीचे दहन करण्यासाठी आज रिपब्लिकन सेनेच्या वतिने भ्रष्टाचाराची होळी करण्यात आली.
यातून शासनाचे लक्ष वेधण्यात येऊन जनतेची लूट आणि पर्यावरणाची हानी रोखण्यात यावी अशी भावना आंदोलकांच्या वतिने व्यक्त करण्यात आली.
तलाठी, मंडल अधिकारी यांची मनमानी, महसूल प्रशासनातील भ्रष्टाचार रोखण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही या प्रतिकात्मक होळी दरम्यान मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव, तालुकाध्यक्ष डॉ. युवराज खरे, महासचिव निलेश देवरे, तालुका उपाध्यक्ष योगेश साळवे, प्रसिद्धी प्रमुख कैलास अहिरे, उपाध्यक्ष दिनेश निकम, अतुल खरे, मनोज जगताप, महेंद्र बच्छाव, हेमराज गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
