ठाणे ग्रामीण प्रतिनिधी, विकी जाधव
- कर्जत : IBSAR कॅम्पस, कर्जत येथे IBSAR GROUP च्या वतीने १० मार्च २०२६ रोजी “नुक्कड नाटक” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सामाजिक विषयांवर जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी बालमजुरी व शिक्षण, महिला सशक्तीकरण व सुरक्षा, हुंडाबळी, मतदान जनजागृती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय आणि संवादातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत उपस्थित प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले.
या कार्यक्रमाचे परीक्षण डॉ. मोहिनी भट्टाचार्य (प्राचार्य, IBSAR Group) आणि वैशाली मॅडम (उपप्राचार्य, IBSAR Public School) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जाणीवपूर्वक सहभागाचे विशेष अभिनंदन केले.
या स्पर्धेचे आयोजन प्रा. श्रद्धा कोळेकर मॅडम आणि प्रा. नम्रता मिसाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. मोहिनी भट्टाचार्य मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्वप्नाली मॅडम, दिपाली मॅडम, सुजाता मॅडम, विशाल सर, अमित सर आणि इतर प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले. यावेळी प्रशासकीय विभागातून अविनाश सर, मते सर आणि संजय सर यांच्यासह अनेक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी IBSAR ग्रुपच्या सर्व विद्यार्थ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले, त्यामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
स्पर्धेत प्रत्येक संघात सात सदस्यांचा सहभाग होता आणि प्रत्येक सादरीकरणासाठी १५ ते २५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.





