नागपूर प्रतिनिधी जयंत चौव्हान
भारतीय रेल्वे माल गोदाम श्रमिक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश इकाई (दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन) तर्फे एक दिवसीय कार्यकर्ता सम्मेलन व राष्ट्रव्यापी दौऱ्याचा कार्यक्रम रविवारी (दि.१५ मार्च) मिलन कम्युनिटी हॉल, डब्लिंग कॉलनी, सिव्हिल लाईन, गौतम नगर, गोंदिया येथे उत्साहात पार पडला. या परिषदेत रेल्वे माल गोदामातील श्रमिकांना संघटित करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री अरुण कुमार पासवान यांच्या गोंदिया आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गेटपासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांना मिरवणुकीने आणण्यात आले. उपस्थित महिला-पुरुष श्रमिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रात प्रथमच त्यांच्या आगमनामुळे श्रमिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राष्ट्रीय महामंत्री अरुण कुमार पासवान, रणवीर सिंह, सुधीर गुप्ता, सुनील सरोदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व मुकदम यांच्या वतीने अरुण पासवान यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांचाही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
गोंदिया, बालाघाट, कन्हान, नागपूर, अजनी व वडसा येथील माल गोदामातील मुकदमांना शाल, श्रीफळ, दुपट्टा व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते नोंदवही (रजिस्टर बुक) वाटप करण्यात आले. या नोंदवहीत दररोज उपस्थिती व कामकाजाची नोंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रीय महामंत्री अरुण कुमार पासवान उपस्थित होते. यावेळी रणवीर सिंह (प्रभारी), सुधीर गुप्ता, हर्केशजी, विमल कुमार, सुनील निगम, पाटील सर, शेखर बोरकर, अजित कुमार, बलीराम रेवटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अजित कुमार (डिव्हिजन उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वात सुनील सरोदे (अध्यक्ष), शशांक मेघरे (उपाध्यक्ष), चंद्रशेखर वैरागडे (सचिव), अश्विन गुहारीकर (सहसचिव), जयंत येरपुडे (कोषाध्यक्ष), धनंजय भरणे (सहकोषाध्यक्ष), मंगेश शिंदेमेश्राम (कार्यालय प्रभारी), सौरभ वैरागडे (सह कार्यालय प्रभारी), शुभम कडू व प्रथमेश सोनटक्के (कार्यकारिणी सदस्य) यांनी केले.
आपल्या भाषणात अरुण कुमार पासवान यांनी श्रमिकांना एकजुटीचे आवाहन करत, “भारतीय रेल्वे माल गोदामातील श्रमिकांनी उठून जागे व्हावे आणि संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा. व्यवस्था परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आपण बदललो तरच व्यवस्था बदलेल. श्रमिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे,” असे सांगितले. तसेच रेल्वे माल गोदामातील श्रमिकांनी सरकारी नोंदणी करून नवीन लेबर कोड अंतर्गत आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात बालाघाट माल गोदामचे राजेश पाचे, रज्जु कुंभारे, दिनेश पाचे, संतोष कतरे, ज्ञानिराम मात्रे, देवीलाल लिलहारे, राजेश निखारे, सुरेश खैरवार, गोंदिया माल गोदामचे राजू पाचे, दिलीप नेवारे, निहाल माने, विनोद बघटाते, रितेश माने, बाबलू पाचे, रत्न बोबचे, सुरेश मराठे, वडसा माल गोदामचे रामदास सहारे, विजय मेश्राम, अंतराज ठाकरे, भोजराज मेश्राम, रविंद्र कुंभले, सुभाष चंडिकार तसेच अजनी माल गोदामचे रमेश दहाके, संतोष अरवार, प्रवीण पाटील, रवि बेलेकर, मंगेश मूर्वातकर आदी श्रमिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर वैरागडे यांनी केले तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन सुनील सरोदे यांनी केले. कार्यक्रमाला कन्हान, नागपूर, अजनी, गोंदिया, बालाघाट व वडसा येथील रेल्वे माल गोदामातील शेकडो श्रमिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
