संग्रामपूर प्रतिनिधी -नंदकिशोर शिरसोले
— संग्रामपूर / हरिनाम शुद्ध, सात्विक,पवित्र आणि तारक आहे म्हणून हरिनामाचा काला सकल जनांनी घ्यावा. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या माध्यमातून तयार झालेले तत्व म्हणजे ईश्वर. जीव आणि शिव हे भिन्न नसून एकच आहे या जीवा शिवाचे एकरूप स्वरूप म्हणजे काला होय या काल्याला वारकरी संप्रदायामध्ये अभेद तत्वाचा काला म्हटले गेले. गोपाल काल्यातून भगवंतांनी समतेचा संदेश दिला असल्याचे प्रतिपादन हभप सारंगधर महाराज गोळेगावकर यांनी केले.
येथील पुरातन अशा विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आयोजीत भागवत कथा आणि हरी कीर्तन सोहळ्याची सांगता गेल्या १६ मार्च रोजी भव्य महाप्रसादाने करण्यात आली त्यावेळी काल्याच्या कीर्तनातून उपदेश करतांना ते बोलत होते.
संत महात्मे जगाचे हित जाणून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम देतात म्हणूनच संताना माऊली म्हणतात.मानवाचे जीवन निर्व्यसनी,विवेकशील आणि मानवतेचा विचार घेऊन चालणारे असावे वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला अनन्य साधारण महत्व आहे.संतांचे आणि देवाचे संगती मध्ये मानवाचे जीवन कृतार्थ होते,जगाचे कल्याण व्हावे सर्वांनी एकरूप आणि गुण्या गोविंदाने रहावे हेच वारकरी विचारांची शिकवण असल्याची त्यांनी शेवटी सांगितले.
संग्रामपूर येथील हभप अतुल महाराज गायकी यांच्या सुमधुर वाणीतून गावकऱ्यांनी सप्ताहभर भागवत कथा श्रवण केली तर ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हभप रामेश्वर आंबलके,हभप प्रशांत महाराज तायडे,हभप पवन महाराज शास्त्री यांनी सांभाळले.दररोज पहाटे काकडा आरती,रामधून, ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ, आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. यावेळी विशेषतः महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.दरम्यान या कथा सोहळ्याला गावातील वयोवृद्ध आणि वारकरी विचारांचे जुने जाणते पाईक सखाराम महाराज आणि श्रीराम महाराज यांच्या विचारांचे पुरस्कर्ते सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप सुखदेव महाराज व्यवहारे,हिंदू सेवक अमोल अंधारे,युवासेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष चेतन पाटील,यांचे सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. तर महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी या वर्षी कार्यक्रमासाठी आमंत्रित केली होती.
या वेळी काल्याच्या कीर्तनसेवे नंतर गावातील अन्न दात्यांच्या सहकार्याने आयोजीत महाप्रसादाचा सुमारे पाच हजारांवर लोकांनी लाभ घेतला.यावेळी महिलांनी स्वतः चे घरून पोळ्या( शिदोरी)आणून काल्याच्या महाप्रसाद साजरा केला.तर स्वादिष्ट असा महाप्रसाद तयार करण्यासाठी शांताराम बोंबटकर यांनी तर महाप्रसाद भाविकांना वितरीत करण्यासाठी गावातील बजरंग दल,दुर्गा वहिनी,विठ्ठल मंदिर हरिपाठ महिला मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ,विठाबाई भजनी मंडळ,आनंदा माता महिला भजनी मंडळ,केशव गणेश मंडळ,विश्व हिंदू परिषद, संत मोतीराम बाबा सद् गुरु भजनी मंडळ,महात्मा फुले प्रतिष्ठान आदी स्वयंसेवी व अध्यात्मिक सेवा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी परिश्रम घेतले.
सप्ताह दरम्यान अन्नदान करणारे,संत भोजन आणि संत पूजन किंवा अन्य प्रकारात सहकार्य करणाऱ्या यजमानांचा भागवत सेवा समिती तर्फे शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.तर संध्याकाळी सात वाजता गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात भागवत ग्रंथाची भव्य अशी पालखी मिरवणुक काढण्यात आली.या वेळी गावातील महिलांनी आपल्या घरा समोर सडा समार्जन करून व रांगोळी काढून आणि दिवे लाऊन भागवत दिंडीचे स्वागत केले.आठवडी बाजार परिसरात रात्री या दिंडीचे आरती करून विसर्जन करण्यात आले. हभप एकनाथ महाराज पाचमासे गुरूजी यांच्या मार्गदर्शनात श्रीमद भागवत सेवा समितीचे
अध्यक्ष सुधीर मानकर उपाध्यक्ष अभिजीत शिरसोले,शुभम राजनकर,पांडुरंग इंगळे, ओमप्रकाश धूत,प्राचार्य अशोक थोटांगे,पीयुष राजनकर,शरद वानखडे,राजेश चोपडे,दिनकर अष्टकर,दिलीप राजनकर, ॲड.शिवशंकर गायकी,नगरसेवक भारत बावस्कर,विक्रम उमरकर,गणेश वानखडे,गोलू उमरकर, गजानन सपकाळ,अरुण राजनकर,राम गावंडे,गोपाल बैरागी,दीपक बेंदरकर,दर्शन महाराज जोशी,यांचेसह नारायण हातेकर,काशिनाथ सावतकर,रामदास गावंडे,रमेश तायडे या मंदिर विश्वस्ता सह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सुधीर मानकर यांनी तर ॲड शिवशंकर गायकी यांनी आभार व्यक्त केले.
