जाकीर अन्सारी राजगुरुनगर प्रतिनिधी -:
खेड तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गाजवळ जैदवाडी गावच्या हद्दीत एका ३३ वर्षीय तरूणाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे , गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरूणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
धनंजय मारूती घेवडे(वय३३ वर्ष) मूळ राहणार कारेगाव ता .आंबेगाव जि.पुणे सध्या राहणार राक्षेवाडी, राजगुरुनगर असे मृत तरूणाचे नाव आहे बुधवारी ( दिनांक १८रोजी) सकाळी ११वा. सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार धनंजय घेवडे हे १६ मार्च रोजी रात्री ९ वाजेपासून बेपत्ता होते कुटूंबीय त्याचा शोध घेत असतानाच बुधवारी सकाळी जैदवाडी परीसरात एका निर्जन स्थळी त्या चार मृतदेह आढळून आला मृतदेहाच्या डोक्यावर आणि तोंडावर धारधार शस्त्राने खोलवर चार वार केल्याचे दिसून आले, तसेच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता.
नियोजनबद्ध हत्येचा संशय.
घटनास्थळी धनंजय याची दुचाकी मिळून आली ज्या क्रुरतेने हा हल्ला करण्यात आला आहे त्यावरून हा खून नियोजनबद्ध पद्धतीने केलेला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला,या प्रकरणी खेड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञाताविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास खेड पोलिस करत आहेत
