प्रतिनिधी /स्वाती हडकर
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका ते इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दरम्यान एका भरधाव टँकरने दोन ते तीन वाहनांना धडक देत अपघात घडवला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टँकर चालकाला पकडून चांगलाच धडा शिकवल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे चिपळूण-कराड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.
