दैनिक चालु वार्ता वर्धा- उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————
—————————
वर्धा- आष्टी:- अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ,तालुका व ग्रामसेवाधिकारींच्या निवडीला सुरुवात झाली असून आश्रमच्या तत्त्वप्रणाली आणि आचारसंहितेनुसार वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका सेवाधिकारी पदी दीपक खरडे, उपसेवाधिकारी सुरेश नागपुरे ,सचिव गजानन सरोदे यांची नुकतीच निवड करण्यात आली.जिल्हा सेवाधिकारी प्रभाकर गायकवाड यांनी आष्टी तालुका सेवाधिकारी पदी दीपक खरडे यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी उपसेवाधिकारी सुरेश नागपुरे खडकी, सचिव गजानन सरोदे भारसवाडा, प्रचारक सतीश खरबडे तळेगाव, कोषाध्यक्ष युवराज राऊत आष्टी, भजनप्रमुख वसंत ढवळे गुरुजी आष्टी, कीर्तनकार शंतनु महाराज धर्माळे खडकी, युवक प्रमुख विनय तळहांडे साहूर, कृषीतज्ञ बाबाराव मोकदम आष्टी ,कार्यकारणी सदस्य बबन वाघ शिरसोली, पंजाब कोहळे खंबीत,यादव मडावी पांढुर्णा, सुभाष रिठे बोरगाव, गुणवंत राऊत माणिकवाडा, लक्ष्मण सनेसर वर्धपूर, प्रवीण गोहाड आष्टी, श्रीराम ठोंबरे तारासावंगा, प्रवीण वाघमारे सत्तरपुर ,तेजराव गावंडे धाडी, शरद वरकड साहूर, रवींद्र वडस्कर वडाळा ( श.), प्रमोद दुर्गे तळेगाव, प्रकाश विजेकर आष्टी, मनोहर भोंडे पोरगव्हाण,
विधीतज्ञ ॲड. प्रकाश गायकवाड आष्टी,प्रसिद्धी प्रमुख अमोल सोटे आष्टी व मार्गदर्शक म्हणून अ.भा. गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम केंद्रीय कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य रमेशचंद्र सरोदे यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या समितीचे गुरुकुंज आश्रमचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ , उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील,प्रचारप्रमुख गोपाल कडू ,डॉ. राजाराम बोथे यांनी स्वागत केले आहे.
