संग्रामपूर: नंदकिशोर शिरसोले…
महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते वैभव डाबरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बारी ब्रिगेड ही बारी समाज बांधव यांचे संघटन त्यांच्या विकासासाठी तसेच समाजाच्या हितासाठी लोकचळवळ म्हणून स्थापन असलेल्या बारी ब्रिगेडचे संस्थापक प्रल्हादराव दातार, तसेच राज्य सल्लागार डॉ अशोक भुते यांच्या उपस्थितीत बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांना दि.४ रोजी वरवट बकाल येथील संघटनेच्या कार्यालयात नियुक्ती पत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी बारी ब्रिगेडचे पदाधिकारी सह बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
