दै चालु वार्ता उदगीर, प्रतिनिधी-अविनाश देवकते
▪️आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयात आयोजन
▪️शिल्पा बनसोडे यांनी तरुणांना कौशल्य विकासाचे केले आवाहन
__
______________________________________
*उदगीर (जि. लातूर) :* मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यामुळे शिकलेल्या तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
या मेळाव्याप्रसंगी बोलताना खासदार शिल्पाताई संजय बनसोडे म्हणाल्या, “आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य विकास आणि योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा रोजगार मेळाव्यांमुळे तरुणांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य नोकरीची संधी मिळते व त्यांच्या करिअरला दिशा मिळते. अनेक रोजगार मेळाव्यांमधून शेकडो तरुणांना रोजगार मिळत आहे.”
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रितम बोरा, नगराध्यक्षा स्वाती हुडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद सदस्य प्रा. दिलीपकुमार मटके, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. श्याम डावळे, बालाजी भोसले, वसंत पाटील, उपसभापती विकी भोसले, मंगला तिरुके, नगरसेविका निकिता अंबरखाने, पंडित सूर्यवंशी, यशवंत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सहसचिव प्रशांत पेन्सलवार, महादेव नौबदे, चंद्रशेखर पाटील, शुभम केंद्रे, शिलरत्न शेळके, प्रदीप कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याचे आयोजन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह. भ. प. सतीश सुळे महाराज, लक्ष्मीकांत मुळे, प्रा. एन. टी. तिरकमटे यांनी केले होते.
शहरात आयोजित या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध नामांकित कंपन्या, उद्योगसमूह व संस्थांच्या सहभागामुळे रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी निर्माण झाली. मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
शिल्पा बनसोडे पुढे म्हणाल्या, “शासन व विविध संस्था रोजगारनिर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत; मात्र तरुणांनी स्वतःमध्ये कौशल्ये विकसित करून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा.” तसेच महिलांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन आत्मनिर्भर व्हावे, यावरही त्यांनी भर दिला.
या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी ऑन-द-स्पॉट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली. शेकडो युवक-युवतींनी आपले बायोडेटा सादर करून मुलाखती दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्षा मुस्कावाड व मंगनाळे यांनी केले. या रोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
—
