ठाकरेंच्या खासदारानी सुनावलं; ‘ऑपरेशन टायगर’ची हवाच काढली !
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुप्त बैठक घेतली. या बैठकीला उद्धव ठाकरेंचे 9 खासदारांपैकी 8 खासदार उपस्थित असल्याचे वृत्त समोर आले होते. शिंदें ‘ऑपरेशन टायगर’ अॅक्टिव्ह करत ठाकरेंना धक्का देण्याची तयारी करत असल्याची चर्चा होती.
या बैठकीला ठाकरेंचे मुंबईतील खासदार देखील उपस्थित होते, असे सांगण्यात येत होते. त्यामध्ये खासदार अरविंद सावंत यांचे देखील नाव होते.
या वृत्तानंतर अरविंद सावंत यांनी समोर येत संताप व्यक्त केला आहे. विकली जाणारी ही औलाद नाही. उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच आहे. ‘मातोश्री’ची प्रतारपणा करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले
ते म्हणाले,’माझा मोबाईल तपासा, कुणाचाही फोन आला नाही आणि मी कोणाशी बोललो नाही. त्यात काही अडळलं तर द्याल ती शिक्षा घेईल मी. खोट्या बातम्या कशाला देता.
‘प्रत्येक खासदार आपआपल्या कामात आहे. बैठकीला गेले तर मग फोटो छापून द्या. आता 24 एप्रिला शिवसेना पक्ष, चिन्हा बाबात सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या अन् मग कोर्टात दाखवाचं सगळे आमच्यासोबत आहेत, अस त्यांचा डाव आहे’, असे देखील ते म्हणाले.
अरविंद सावंत यांनी चुकीची बातमी का देता? असा संताप व्यक्त करत अब्रुनुकसानीचा दाव करणार असल्याचे म्हटले. तसेच या संदर्भात लिहिलेल पत्र देखील दाखवले.
आदित्य ठाकरेंचे देखील नाव टाकतील…
संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरची खिल्ली उठवली. ते म्हणाले, ठाकरेंचे नऊ खासदार एकजुट आहेत. मी त्या यादीतील नाव वाचली तर मला हसायला आलं. उद्या हे लोक माझ नाव टाकतील, आदित्य साहेबांचे नाव देखील त्यात टाकतील. अशा बातम्या केवळ वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जातात.
