अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी राष्ट्रवादी द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी यशवंत वर्मा यांची बदली दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद न्यायालयात झाली होती.
ही बदली वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोट्या आढळल्यानंतर झाली होती.
न्यायाधीश वर्मा यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी अलाहाबाद न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. वर्मा यांनी आपल्या राजीनामान्याचं कारण सांगितलं नाही. या पदावर काम करणे हे सन्मानजनक होते, असं वर्मा यांनी म्हटलं आहे.
मुर्मू यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात वर्मा म्हणाले, “मला हे पत्र लिहिण्यासाठी भाग पाडणारी कारणे मी सांगू शकत नाही. पण, अत्यंत खेदपणे मी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देत आहे.
१४ मार्च २०२५ रोजी दिल्लीत यशवंत वर्मा यांच्या घरातील एका खोलीला आग लागली होती. आगीवर नियंत्रण आणत असताना तिथे मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळून आल्या होत्या.
एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आढळल्यावर वर्मा हे चर्चेत आले होते. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्याधीशांनी एक समिती गठीत केली होती. समितीने वर्मांना हटवण्यासाठी शिफारस केली होती. त्यातच मार्च २०२५ मध्ये वर्मांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद न्यायालयात उचलबांगडी करण्यात आली. पण, वर्मा हे राजीनामा देत नसल्याचे पाहून त्यांच्याविरोधात संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता.
या महाभियोग प्रस्तावावर लोकसभेच्या १४६ खासदारांनी सही केली होती. लोकसभा अध्यक्षांनी चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समिती बनवली होती. याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यातच वर्मांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना सोपावला आहे.
