दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊन जवळपास महिना उलटला असून आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. निकाल कधी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे.
दरम्यान, निकालासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान बारावी आणि दहावीच्या परीक्षा पार पडल्या. बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आतापर्यंत 14 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या रिपोर्ट तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (SSC-HSC Result 2026)
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणीही वेगात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पेपर तपासले गेले असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दहावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
तथापि, निकालाच्या तारखांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
कुठे पाहता येईल निकाल ? (SSC-HSC Result 2026)
खालील लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल चेक करता येऊ शकतात
https://mahresult.nic.in
https://hscresult.mkcl.org
https://hscresult.mahahsscboard.in
सीबीएसीचा निकाल जाहीर
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच सीबीएसईने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26
चा निकाल 93.70 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीचा निकाल 93.66 टक्के होता, त्या तुलनेत यंदा निकालात सुधारणा झाली आहे.
