ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण दिवा शहरात ज्या ‘गूढ’ नावाची चर्चा होती, त्या ‘ROKO’ ब्रँडचा अखेर उलगडा झाला आहे! निव्वळ अफवा नाही, तर थेट कृती! देशातील पहिला अधिकृत नोंदणीकृत (Registered) स्ट्रीट फूड ब्रँड ‘ROKO वडापाव’ आता दिवेकर खवय्यांच्या भेटीला येत आहे.
उद्घाटनापूर्वीच वडापाव प्रेमींनी असा काही प्रतिसाद दिला की, तब्बल १० हजार वडापावचे प्री-बुकिंग पूर्ण झाले आहे. ब्रँडेड चव आणि विश्वासार्हता यामुळे हा आकडा सातत्याने वाढत आहे.
✨ सोहळ्याचे मुख्य आकर्षण:
या ग्रँड ओपनिंगसाठी मराठी बिग बॉस सीझन ६ ची विजेती ‘तन्वी कोलते’ खास उपस्थित राहणार आहे. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याची आणि ‘ROKO’ ब्रँडची चर्चा आता संपूर्ण ठाणे जिल्ह्यात रंगली आहे.
🎁१० रूपयात ग्राहकांना काय मिळणार आहे ?
अवघ्या १० रुपयांत वडापाव: ब्रँडेड चवीचा आस्वाद प्रत्येकाला घेता यावा यासाठी उद्घाटनाच्या दिवशी वडापाव फक्त १० रुपयांत मिळणार आहे.
५ लाखांची बक्षिसे: केवळ पोटपूजा नाही, तर नशीब आजमावण्याचीही संधी! लकी ड्रॉद्वारे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि मोबाईल यांसारखी ५ लाख रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत.
📍 कधी आणि कुठे?
दिवस: १ मे, महाराष्ट्र दिन (उद्या)
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
स्थळ: चंद्रांगण सोसायटी, दिवा चौक, दिवा (पूर्व).
”Eat Hot, Hit Hard!” असा नारा देत ‘ROKO’ आता दिव्यात क्रांती करण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.
