West Bengal मध्ये सत्ताबदलानंतर बांगलादेशी कट्टरपंथी आक्रमक; भारतविरोधी गरळ ओकली !
पश्चिम बंगालमधील सत्ताबदलाचा परिणाम सीमेपलीकडील बांगलादेशात दिसू लागला आहे.भाजपच्या सत्तेत येण्याने बांगलादेश कट्टरपंथीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशातील कट्टरपंथी मौलाना इनायतुल्लाह यांनी उकसवणारे भाषण केले आहे. त्यांनी थेट भारतविरोधी युद्धाची धमकीची भाषा केली आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताच्या अंतर्गत विषयात मौलानांचा हस्तक्षेप
बांगलादेशी मौलाना इनायतुल्लाह त्यांच्या भारतविरोधी भाषणामुळे सतत चर्चेत असतात. यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताबदलावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज असुक्षित असेल, तर बांगलादेशातील हिंदूनाही सुरक्षा मिळणार नाही. अशा उघड धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मौलानांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना बांगलादेशच्या तारिक रहमान सरकाकडेही मोठी मागणी केली आहे. भारताशी असलेले व्यापारी आणि राजकीय संबंध तोडून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन राजकीय दबाव निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मौलना यांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये आता हिंदू केंद्रित व्यवस्था राबवली जाईल. तेथील मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकाने हटवण्यासाठी खेळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी मौलाना अब्बासी यांनी बांगलादेशातील मदरशांना लष्करी तळे म्हणून वापरण्याची आणि भारतावर हल्ल्याची धमकी दिली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इस्लामिक झेंडा फडकवू असे त्यांनी म्हटले होते.
कोण आहेत मौलाना अब्बासी?
इनायतुल्लाह अब्बासी त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांनी २०२४ मार्च मध्ये जिहादची हाक दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातही भाष्य केले होते.
भारताची भूमिका
सध्या बांगलादेशी मौलाना अब्बासी यांच्या अशा प्रभोक्षक विधानानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सीमेपलीकडून धार्मिक युद्धाचे ऐलान केले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
