
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- धसवाडी ता .अहमदपूर जि लातूर येथील अथक परिश्रम करून पीएच.डी.पदवी मिळविलेल्या कु.कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर हार्दिक अभिनंदन. धसवाडी ता.अहमदपुर जि.लातुर अशा अतिशय दुर्गम, ग्रामीण भागात राहणारी,कसलीही कौटूंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या,गरीब शेतकरी कुटूंबामध्ये जन्मलेली कु.कान्होपात्रा सखाराम क्षीरसागर या विद्यार्थ्यांनी ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून,केवळ स्वःताच्या जिद्दीने प्रचंड मेहनत अविरत परिश्रम घेऊन अभ्यास आणि संशोधन करुन ” शैला लोहिया यांच्या साहित्याचा विवेचक अभ्यास ” या विषयावर परळी वैजनाथ येथील डॉ.राजकुमार यल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे मराठी विषयातील पीएच.डी.साठी सादर केलेला शोध प्रबंध विद्यापीठाने स्विकारला असुन ,मौखिक परिक्षा घेऊन विद्यापीठाने पीएच.डी.पदवी बहाल केली आहे.
त्यामुळे तिचे थोर विचारवंत व साहित्यक प्रा.डॉ.कसाब सर ,धसवाडीचे सरपंच प्रेमचंद दुर्गे, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती धसवाडी,माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख साहेब यांनी गावातील सर्व ग्रामस्थ यांच्याकडुन तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे व तिच्या सर्व कुटूंबीय यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.