
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मंनधरणे
देगलूर: कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र मुदखेड च्यावतीने 62 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सकाळी 7:00 वाजता ध्वजारोहण मा. श्री.विश्वास देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर केंद्रात कामगारासाठी परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती. अध्यक्ष संगिता थोरात तालुका अध्यक्ष महिला बचत गट तालुका मुदखेड यांनी कामगाराना व उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार केंद्रप्रमुख नागेश कल्याणकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र कर्मचारी श्रीमती आडगावकर,मैनाळे,राजभोज यांनी सहकार्य केले.