
दैनिक चालू वार्ता कलंबर प्रतिनिधी- हनमंत शिरामे
भोपाळेवाडी :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कै. बळीराम पाटील प्रार्थमिक शाळा भोपाळेवाडी ता लोहा येथे शाळेच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री. माधव भोपाळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर वार्षिक परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ईयत्ता पहीली ते चौथी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आल्या. प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच उपस्थितांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित श्री.रावसाहेब भोपाळे मा. सरपंच, शिवाजीराव भोपाळे से. स. सो. संचालक, बालाजी भोपाळे, उत्तमराव भोपाळे, उद्धवराव भोपाळे, अशोक भोपाळे, जीवन भोपाळे, मौलाना शेख, अंगणवाडी च्या कार्यकर्ती सौ. रशिदबी शेख, सौ. सुलोचना कंदलवाडे, शाळेतील शिक्षिका राजश्री कंधारे तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी उपस्थित होते.