
दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी नवनाथ यादव
भूम:- पवित्र रमजान निमित्त समाजामध्ये परस्परातील स्नेह आणि बंधुता वृद्धिंगत होवो.एकात्मतेचा संदेश सर्वदूर पोचण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा या पवित्र रमजान निमित्त वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी मर्कज मस्जिद जवळ, गांधी चौक भूम येथे मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान महिन्यातील रोजानिमित्त इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली.ईद उल फित्र अर्थात रमजान ईद वंचित चे नेते प्रविण रणबागुल यांनी रमजान ईदच्या भूम शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.पवित्र रमजान निमित्ताने करुणा, बंधुता आणि सौहार्दाची भावना आणखी वाढावी. प्रत्येकजण निरोगी रहावं आणि सगळ्यांचीच भरभराट व्हावी, असे वंचित चे नेते प्रवीण रणबागुल यांनी शुभेच्छा देताना म्हटले.यावेळी प्रविण दादा रणबागुल मित्र परिवाराकडून हजी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी भूम पदाधिकारी, प्रविण दादा रणबागुल मित्र परिवार, मुशाभाई शेख, वैभव गायकवाड,धीरज शिंदे, असिफ भाई जमादार, मुशीर शेख,प्रदीप कांबळे, पत्रकार प्रमोद कांबळे, गौस शेख, मुकूंद लगाडे, आब्बास सय्यद, वसिम काजळेकर,रोहित चंदनशिवे, महावीर बनसोडे, नवनाथ यादव, अजित बागडे, रवींद्र लोमटे, आदीसह वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी, असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.