
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील देवळाली येथे क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891व्या जयंतीनिमित्त तसेच देवळाली गावातील वीरशैव लिंगायत समाजातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्व महिला व पुरुष यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त लिंगायत स्मशानभूमीला व नागनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रविण भैय्या शेटे यांच्या स्वखर्चातून करण्यात आले.यावेळी या कामाचा शुभारंभ भूमिपूजन भूम न. प.चे गटनेते मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय नाना गाढवे यांनी देवळाली येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सदगुरू श्री. ष.ब्र.१०८ श्रीगुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या शिव दिक्षा संस्कार कार्यक्रमात उपस्थित राहून शिवाचार्य मानुरकर महाराज यांचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले.यावेळी श्री संजय नाना गाढवे यांच्या हस्ते येथील लिंगायत समाज स्मशाभूमी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सरपंच सचिन माने, धनंजय शेटे, उपसरपंच सागर खराडे, प्रविण शेटे, बाबा शेटे ,संदिप खराडे, बाळू हापसे, प्रकाश स्वामी, बाजार समिती संचालक युवराज तांबे ,बाळासाहेब गवळी,पत्रकार आबास सय्यद यांच्यासह सर्व ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.