
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख केला तर प्रथमतः अग्रस्थानी पांडुरंग रानबा सोनकांबळे चिखलभोसीकर यांचे नाव घेतले जाते. यांना यापुर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.त्यात नुकताच नांदेड येथे दिला गेलेला सावित्री महीला मंच नादेंड तर्फे “सावित्री गौरव पुरस्कार २०२२” उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण च्या अध्यक्षस्थानी अनिल मोरे माजी सनदी अधिकारी, उद्घाटक म्हणून डॉ. टी एल माळवदकर, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.अजय क्षीरसागर, यासह मंचावर अनेकांच्या उपस्थिती संयोजक ऍड करूणा मॅडम संचालीका सावित्री महिला मंच नांदेड यांच्या वतीने ०१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कुसुम सभागृह नांदेड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पांडुरंग रानबा सोनकांबळे चिखलभोसीकर यांचे सामाजिक,सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक योगदान पाहता ते उल्लेखनीय कामगिरी केले असल्याची दखल नक्कीच घेतली गेलेली आहे. त्यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत असंख्य आंदोलने करून तत्कालीन शासन व प्रशासनाला सळो कि पळो करून सोडले.”दिल्ली संसद भवन वर अनेक आंदोलने,धरणे, उपोषणे करणे हे येरे गबाळ्याचे काम नव्हे”असे त्यावेळी अनेकदा बोलून दाखवले,आजही बोलताना दिसतात.अनेक संघटनेच्या माध्यमातून काम करून समाजाला दिशा देण्याचे त्यांना भाग्य लाभले. प्रेरक प्रेरिका यांना काही अंशी न्याय मिळवून दिला.तसेच विधायक कार्य करत असताना शारिरीक, आर्थिक, मानसिक त्रासही सोसावा लागला हे विसरता येत नाही.समाजजागृती केली.ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपन,महिला सबलीकरण, ग्रामविकासाच्या योजनांचु माहिती ग्रामस्तरावर दिली, असंख्य समाजातील पिडीत वगैरे ना न्याय मिळवून दिला.समाजहिताचे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरले, रात्रंदिवस कष्टकरी,कामगार यांच्या साठी झगडले यामुळे यांच्या कार्याची दखल घेऊन या दांपत्याना सावित्री महीला मंच नादेंड तर्फे “सावित्री गौरव पुरस्कार २०२२” वितरीत करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पांडुरंग आर.चिखलभोसीकर यांनी मान्यवरांचे,पुरस्कार आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले. त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून तळागाळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.